कोजागिरी पौर्णिमा निमित्त नगरसेवक अमिंत भाऊ चिंतामणी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 26, 2023

कोजागिरी पौर्णिमा निमित्त नगरसेवक अमिंत भाऊ चिंतामणी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन....

 कोजागिरी पौर्णिमा निमित्त नगरसेवक अमिंत भाऊ चिंतामणी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन....

ल. ना. होशिग विधालयाच्या प्रांगणात होणार गरबा दांडिया चे आयोजन !


जामखेड -
जामखेड शहरातील नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही जामखेड तालुक्यातील महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमा निमित्त दिनांक २८ आँक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात भव्य गरबा दांडिया चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिली आहे. 
जामखेड शहरातील कोणतेही सार्वजनिक सामाजीक काम असले की, लोकांच्या तोंडी पहिले नाव येते ते नगरसेवक अमित चिंतामणी यांचे जामखेड मध्ये कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून मा. अमित चिंतामणी यांची ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता हकेला धावणारे नगरसेवक मा. अमित चिंतामणी हे मागील ८ वर्षांपासून  कोजागिरी पौर्णिमा निमित्त खास महिलांसाठी ओपन गरबा दांडिया या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. व याही वर्षी म्हणजे ९ व्या वर्षी ओपन गरबा दांडिया चे आयोजन केले असून विषेश आकर्षण म्हणून पुणे येथील नक्षत्र मंगळागौरी ग्रुप च्या महिला धम्माल करणार आहेत. त्याच बरोबर " बाईपण भारी देवा " सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व शिल्पा नवलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी या कोजागिरी पौर्णिमा व ओपन गरबा दांडिया या कार्यक्रमाचा जामखेड तालुक्यातील महिलांनी मनसोक्तपणे आनंद घ्यावा व जास्तीत महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment