प्रत्येक भागातील कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न - महापौर रोहिणी शेंडगे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 11, 2023

प्रत्येक भागातील कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न - महापौर रोहिणी शेंडगे.

 प्रत्येक भागातील कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न - महापौर रोहिणी शेंडगे.

सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक शाम नळकांडे यांच्या विशेष प्रयत्नातून व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या निधीतून समाधाननगर येथील कॉक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण..


नगर -
नगर शहरातील सर्वात जवळच भाग, परंतु सुविधांअभावी या भागात लोक राहण्यास तयार नव्हते, परंतु गेल्या पाच वर्षात या भागतील विकास कामांना चालना देऊन प्रत्येक भागात ड्रेनेज, पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट अशा मुलभुत सुविधा दिल्याने या भागातील नागरिक वस्ती वाढत गेल्या. सहयोगी नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील प्रत्येक कॉलनी, वसाहतीमध्ये सुविधा उपलब्ध होत गेल्याने अनेक नवनवीन वसाहतील निर्माण झाल्या आहेत. येथील नागरिकांच्या सर्वोतोपरि सुविधा देण्यास आम्ही कटीबद्ध असून, प्रभागात प्रत्येक कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. यापुढील काळातही उर्वरित कामे पुर्ण करु. अशा प्रत्येक भागांतील विकास कामांना चालना दिल्याने नगर शहरातही चांगली कामे उभी राहिली आहेत. विशेषत: रस्त्यांच्या कॉक्रीटीरकणावर भर दिल्याने खड्डेमुक्तीकडे नगर शहराची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.

महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या विशेष प्रयत्नातून व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 8 मधील समाधाननगर येथील अंतर्गत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, प्रमोद जरे, दिनकर आघाव गुरुजी, बाळासाहेब निवडूंगे, शरद दाते, काशिनाथ गोलवड, सुनिल परदेशी, रविंद्र पांडे, प्रफुल्लसिंग परदेशी,  राजु तांबोळी, रशिद तांबोळी, भगवान गायसमुद्रे, ईश्वर शेळके, उमेश दानवे, विजय पवार, इम्रान तांबोळी, शुभम सुडके, यश चितळे, स्वप्नील गडाख, प्रज्वल नळकांडे, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब पवार, संपत पंडित, राजु सोनमाळी, भास्कर सोनवणे, संजय धनवट, सौ.विमल गोलवट, पुजा जरे, भक्ती खोपे, आशाबाई पवार, रोहिणी पंडित, संध्या घायवट, स्नेहल शिंदे, मंगल निवडूंगे, सुवर्णा थोरात, रोहिणी जंबे, अंजुम तांबोळी, सना तांबोळी, अर्चना गोलवड, आस्मा तांबोळी, लिलावती गायसमुद्रे, चंद्रकाला सोनवणे, सिंधी सुडके आदिंसह नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले की, पुर्वी या भागाचे नाव मेवाडनगर असे होते, परंतु या भागातील बहुसंख्य विकास कामे आम्ही मार्गी लावल्याने त्या भागातील नागरिक समाधानी झाले व त्यांनी परिसराचे नाव आता ‘समाधाननगर’ केले आहे. या भागात 15 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत होता, परंतु आता 4 दिवसांतून होत आहे. या भागातील स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, पाण्याची लाईन, कचरा गाड्या, रस्ते या सर्वच मुलभुत सुविधा नागरिकांना मिळत आहेत, याचे आम्हालाही समाधान आहे.

याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्रित प्रयत्न केले जात असल्याने या भागासाठी मोठा निधी उपलब्ध करुन घेत विकास कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही असेच कामे होत राहतील, असा  विश्वास व्यक्त केला.

यावेळी गणेश कवडे, पुष्पाताई बोरुडे आदिंनी मनोगतातून प्रभागाच्या विकासासाठी योगदान देऊ, असे सांगितले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रमोदकुमार जरे यांनी केले तर आभार बाळासाहेब निवडूंगे यांनी मानले. यावेळी नागरिकांच्यावतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment