वारुळाचा मारुती परिसरात पंचबा निमित्त स्वच्छता मोहिम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 18, 2023

वारुळाचा मारुती परिसरात पंचबा निमित्त स्वच्छता मोहिम.

 भाविकांनी पंचबा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - महापौर रोहिणी शेंडगे.

वारुळाचा मारुती परिसरात पंचबा निमित्त स्वच्छता मोहिम.


अहमदनगर -
नालेगांव येथील वारुळाचा मारुती हे जागृत देवस्थान आहे, श्रावणी सोमवारी या ठिकाणी पचंबा (जत्रा) भरत असते. नगरसह जिल्ह्यातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने श्रावणी सोमवारी या परिसरातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भाविकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहनही महापौर सौ. रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.

नालेगांव, वारुळाचा मारुती येथे होत असलेल्या पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी पचंबा यात्रेनिमित्त परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.


याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, वारुळाचा मारुती येथील पंचबा हा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, त्यामुळे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच परिसरातील भाविकांचेही नवस असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. भाविकांसह व्यवसायिकांना कोणत्याही प्रक़ारच्या अडचणी येऊ नये यासाठी मनपाच्या माध्यमातून उपयायोजना केल्या जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी मनपाच्या कर्मचार्यांनी परिसराची स्वच्छता करुन यात्रेचे नियोजन केले. या अभियानाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. 


यामध्ये मनपाचे स्वच्छता कर्मचारी, उद्यान विभागातील कर्मचार्यांनी परिसराची स्वच्छता केली, गवत झाडे-झुडपे काढून मंदिराकडे जाणारा रस्ताचे पॅचिंग, या ठिकाणी येणार्या व्यावसायिकांना जागेची आखणी करुन, पाण्याची व्यवस्था, अग्निशमन दल अशी सर्व सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. 


याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment