गोरेगावात वनविभागाच्या पिंजऱ्यात पाचवा बिबट्या जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 25, 2023

गोरेगावात वनविभागाच्या पिंजऱ्यात पाचवा बिबट्या जेरबंद.

 गोरेगावात वनविभागाच्या पिंजऱ्यात पाचवा बिबट्या जेरबंद.

कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी : ॲड प्रवीण तांबे.


गोरेगाव -
गोरेगाव येथील सुतकडा परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. येथे काही दिवसापूर्वी बिबट्याने पशुधनावर हल्ला करून शेळी व कुत्रे फस्त केले होते. यामुळे ग्रामस्थ धास्तावले असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ग्रामस्थांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसताच वन विभागाला माहिती दिली. बुधवारी वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यातील बिबट्याला गाडीत टाकून नेले.

गोरेगाव येथील सुतकडा व परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. मोठे लपन क्षेत्र, दाट झाडी व भोवताली दरी असल्याने या ठिकाणी बिबट्यांचे अस्तित्व आहे. आत्तापर्यंत या भागात चार ते पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सुतकडा येथील अशोक तांबे यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर होता या बिबट्याने पशुधनावर हल्ला चढवत शेळ्या व कुत्रे फस्त केले होते.
 भिमाजी सावळेराम तांबे यांच्या घराजवळही या बिबट्याचा वावर होता. या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात आलेला आहे मात्र या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होत नसल्याने पिंजरा अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती.

यानुसार वन विभागाने पिंजरा हलवून त्यामध्ये भक्ष्य ठेवल्यानंतर हा बिबट्या बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाला. बुधवारी मध्यरात्री या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असले तरी या भागात आणखी बिबट्यांची संख्या असल्याची शक्यता व्यक्त करीत बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ॲड प्रवीण तांबे यांनी केली आहे. 

बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून वनविभागाला माहिती पुरवून मदत करण्याच्या कामी स्थानिक नागरिक यावेळी अशोक तांबे, प्रदीप तांबे, संदीप तांबे, गौरव तांबे, प्रथमेश पानमंद, अभिजित तांबे, गोविंद तांबे, राजू पानमंद, तुकाराम तांबे, स्वप्नील नरसाळे, अमोल तांबे, सुतकडा मित्र मंडळ, गोरेगाव कणीक साबळे, वणपाल -भाळवणी, सुर्यवंशी-वनमजूर आदी उपस्थित होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांच्या मार्गदर्शनाख वनपरिमंडळ अधिकारी के. एस. साबळे. पी. व्ही. सोनवणे, वनरक्षक एन. व्ही. बडे, आय.एफ शेख यांनी बिबट्या जेरबंद होणे कामी कारवाई केली. दरम्यान या बिबट्याला पारनेर येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर माळशेज घाटात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment