जास्तीत जास्त सुविधा देऊन नागरिकांची अपेक्षा पुर्ती - महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 7, 2023

जास्तीत जास्त सुविधा देऊन नागरिकांची अपेक्षा पुर्ती - महापौर रोहिणी शेंडगे

 जास्तीत जास्त सुविधा देऊन नागरिकांची अपेक्षा पुर्ती - महापौर रोहिणी शेंडगे.

प्रभाग क्र.8 मधील बालाजी सोसायटी येथे महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.


नगर -
गेल्या काही दिवसांपासून कल्याण रोड परिसरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे येथील वसाहतींची संख्या वाढत आहे. येथील नागरिकांना सर्व मुलभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध आहोत. प्रत्येक कॉलनी, अर्पाटमेंट परिसरातील स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, पाणी लाईन, रस्ते आदिं कामे प्रामुख्याने मार्गी लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर ओपन स्पेसचाही विकास करुन त्या ठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी विकसित करण्यात येईल. नागरिकांनीही आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. नगरसेवक आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून परिसराचा कायापालट होत आहे. यापुढील काळातही जास्तीत जास्त सुविधा देऊन नागरिकांची अपेक्षा पुर्ती करु. असेच शहरातील प्रत्येक भागातील विकास कामांना प्राधान्य देत ती मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे शहराच्या विकासात भर पडत आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.

प्रभाग क्र.8 मधील बालाजी सोसायटी येथे महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, प्राचार्य खासेराव शितोळी, प्रा. एल.बी.म्हस्के, माणिकराव लगड, लक्ष्मण नरवडे, पोपटराव झावरे, दिनकर आघाव, सोपान गोरे, सतीशसिंग परदेशी, ठकाराम तांबडे, गोपीनाथ लाटे, पुंडलिक आखाडे, बाळासाहेब फंड, आबासाहेब दांगडे, विजय वाघ, भगवान काटे, अंकुश साबळे, सुशांत शिंदे, रामा गुंडू, अक्षय आसलकर, कृष्णा शिंदे, मार्क्स भांबळ, युवराज नळकांडे, अनिकेत शियाळ, योगेश चौधरी, पांडूरंग चोथे, संतोष पवार, भुषण तिरमल, नासिर शेख, प्रशांत शिंदे, गोरक्ष ताकपिरे, अंबादास मुत्याल, अभय दळवी, बापू खिलारी, जयदिप इपलपेल्ली, गाडे अण्णा, प्रविण मुत्याल, सुमन भांबळ, अनिता सोनवणे, आशा पावसे, मंदा तिखे, वैशाली नळकांडे, मनिषा नळकांडे, येमुल अक्का, कोडम अक्का, लक्ष्मी सामल, गवते बाई मनिषा जपकर, प्राजक्त बांगर, सुवर्णा पवार, शिवानी चौधरी, सविता शिंदे आदिंसह नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेवून ते सोडविण्याचा प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याने अनेक कामे मार्गी लागली जात आहेत. परिसराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांच्या सहकार्याने कामे मार्गी लागत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पुष्पाताई बोरुडे, सचिन शिंदे यांनीही प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्रित प्रयत्न करत असल्याने मोठी निधी आपल्या भागासाठी उपलब्ध होत आहे. त्यासाठी महापौरांचे चांगले सहकार्य मिळत असल्याने भविष्यात या भागातील सर्वच कामे मार्गी लावली जातील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान काटे यांनी केले तर आभार विजय वाघ यांनी मानले.

No comments:

Post a Comment