इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तर्फे "संवाद" नाॅलेज सिरीज उपक्रमाचा शुभारंभ.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 29, 2023

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तर्फे "संवाद" नाॅलेज सिरीज उपक्रमाचा शुभारंभ..

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ  आर्किटेक्टस तर्फे  "संवाद" नाॅलेज सिरीज उपक्रमाचा शुभारंभ..


अहमदनगर -
अहमदनगर शहरातील बांधकाम क्षेत्रातील  ख्यातनाम संस्था IIA च्या नवनिर्वाचित कार्यकारिणी च्या उद्घाटनप्रसंगी " संवाद" ह्या आगळ्यावेगळ्या नॉलेज सिरीज चा शुभारंभ शनिवार दि २६ऑगस्ट ला करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ख्यातनाम आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी  ह्यांनी मनोगत व्यक्त करतांना शहर विकासप्रक्रियेत नागरिकांची जनजागृती तसेच  वास्तुतद्न्यांच्या सक्रीय सहभागाचे महत्व विषद केले तसेच  ह्या क्षेत्रांत येणार्या भावी पीढी साठी IIA करीत असलेल्या प्रयत्नां संदर्भात माहीती दिली.
"संवाद "ह्या उपक्रमांतर्गत  आयोजीत कार्यक्रमा चे प्रमुख वक्ते युवा प्रथितयश लॅंडस्केप आर्किटेक्ट मयुरेश देशमुख यांनी वास्तु व नैसर्गीक पर्यावरणाचा समन्वय व समतोल साधतानाच  सौंदर्य द्रृष्टी सोबतच आरोग्य, पर्यावरण,जैवविविधता व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या झाडे,वनस्पतींचे प्रकार ,वैशीष्ट्ये इत्यादिं  चे जतन, संवर्धन करतांनाच वातावरण निर्मीती, फंक्शन व ऍस्थेटिक्स चे महत्वा संदर्भात सविस्तर चर्चा केली.
आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी व मयुरेश देशमुख यांनीहिवरे झरे येथील निसर्गरम्य परिसरात सुरु केलेल्या रिसॉर्ट प्रोजेक्ट चा साईट टूर करुन तेथील फ्यूचर प्लॅनींग ची कल्पना दिली.
ह्या प्रसंगी ज्येष्ठ आर्किटेक्ट श्रीमती मीनल काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अर्कि. नंदकिशोर घोडके,अर्कि. वैभव देशमुख,अर्कि. सुरज झिने, अर्कि. संतोष गायकवाड, अर्कि. तेजस दारवकर यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी संस्थेचे सभासद अर्कि. रोहित साळुंके , अर्कि. दिलीप येवले, अर्कि. स्वप्निल बुऱ्हाडे अर्कि. प्रसाद नरोटे व इतर सभासद उपस्थित होते तसेच रमेश फिरोदिया आर्किटेक्चर कॉलेज चे प्राचार्य सुहास चौधरी व ४० विद्यार्थी उपस्थित होते. IIA ने शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या ह्याअभिनव उपक्रमाचा लाभ घेतला व केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा  experiencial learning साठी सुरु केलेल्या अभिनव उपक्रमाद्वारे "इंटिग्रेटींग लॅंडस्केप प्लॅनींग विथ  बिल्डींग डिझाईन‌ संबंधी च्या संकल्पना सुस्पष्ट झाल्या  बद्दल विशेष कौतुक केले.

No comments:

Post a Comment