पारनेर, नगर तालुक्यातील रात्रीचे भारनियमन रद्द करावे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

पारनेर, नगर तालुक्यातील रात्रीचे भारनियमन रद्द करावे.

 पारनेर, नगर तालुक्यातील रात्रीचे भारनियमन रद्द करावे.

आमदार नीलेश लंके यांची महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना.


पारनेर -
गेल्या चार दिवसांपासून पारनेरसह नगर तालुक्यात रात्रीच्या वेळी सुरू करण्यात आलेले विजेचे भारनियमन रद्द करण्याची सूचना आमदार नीलेश लंके यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना केली आहे.
यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार लंके यांनी म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून पारनेरसह नगर तालुक्यात रात्रीच्या वेळी विजेचे भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत आहेत.
पारनेर, नगर तालुक्यातील मोठा भाग डोंगराळ व दुर्गम आहे.या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.रात्रीच्या वीज भारनियमनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अंधारामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.अंधारामुळे बिबटे मानवी वस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करतात.हे टाळण्यासाठी रात्रीचे भारनियमन रद्द करावे अशी सूचना आमदार लंके यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment