हत्तलखिंडी ते गणेशखिंड डोंगरावर युवकांकडून बीजारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 25, 2023

हत्तलखिंडी ते गणेशखिंड डोंगरावर युवकांकडून बीजारोपण

 हत्तलखिंडी ते गणेशखिंड डोंगरावर युवकांकडून बीजारोपण.

आडवाटेच पारनेर चा उपक्रम - डोंगर भटकंती त अनुभवला निसर्गाचा आविष्कार.


पारनेर - 
आडवाटेचं पारनेर  टिम कडून हत्तलखिंडी येथील महादेव मंदिर पासून, गणेशखिंड ते पुणेवाडी येथील काळभैरवनाथ देवस्थान असा संपूर्ण वर्तुळाकार डोंगर ट्रेक पूर्ण करताना अनेक ठिकाणी बीजारोपण करण्यात आले.

आडवाटेचे पारनेर प्रमुख प्रा तुषार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 40 ते 50 विद्यार्थी व तरुणांनी या ट्रेक मध्ये सहभाग घेतला. हत्तलखिंडी येथील डोंगराच्या कुशीत वसलेल्या महादेव मंदिरा पासून ट्रेकला सुरुवात करण्यात आली. डोंगराला उत्तरेकडून वळसा घालताना डोंगरकपारीत अपूर्ण कोरीव काम असलेल्या पांडव लेण्या पाहून पश्चिम बाजूने डोंगर उतरून आडवाटेची टीम गणेशखिंड मंदिरामागे असलेल्या प्राचीन पोहिजवळ पोहचली. याठिकाणी विद्यार्थ्यांना या पोहीबद्दल, तसेच भालचंद्र गणेश मंदिर आणि परिसरातील इतर ऐतिहासिक खाणा-खुणा बद्दल संकेत ठाणगे यांनी माहिती दिली.. तसेच याठिकाणी काव्यमैफिल, गाण्याच्या भेंड्या आणि छोट्या छोट्या नाटिका घेण्यात आल्या. यामाध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली तसेच बीजारोपण व वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रा तुषार ठुबे, सुभाष परांडे, सचिन गायखे, पंकज न-हे, महाबली मिसाळ, राजू ठुबे,रवि रोकडे आदी उपस्थित होते.भालचंद्र गणेश मंदिर, त्यामागील दरीतील धबधबा, तेथील डोंगर कातळात कोरलेले देवीचे मंदिर असे सर्व निसर्गसौंदर्य न्याहाळत सर्व टीम पुणेवाडीच्या काळभैरवनाथ मंदिरात पोहचली.

सोप्या श्रेणीतील चढ-उतार, हिरवागार निसर्ग, धार्मिक-  ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले पण आडवाटेला लपलेली सुंदर ठिकाणे, बीजारोपण, वृक्षारोपण,सोबतीला निसर्गकविता, गाण्यांची मैफिल या उपक्रमातून मोबाईल मध्ये अडकलेली तरुणाई निसर्गाच्या सान्निध्यात राहून सामाजिक उपक्रम राबवण्याचे आडवाटेच पारनेर समुहाचे कार्य आहे. -  तुषार ठुबे, प्रमुख, आडवाटेच पारनेर समुह

No comments:

Post a Comment