पारनेर तालुक्यातील गुणोरे येथुन 12 लाख 45 हजार किमतीच्या गांज्या ताब्यात; पारनेर पोलीसांची कारवाई.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

पारनेर तालुक्यातील गुणोरे येथुन 12 लाख 45 हजार किमतीच्या गांज्या ताब्यात; पारनेर पोलीसांची कारवाई..

 पारनेर तालुक्यातील गुणोरे येथुन 12 लाख 45 हजार किमतीच्या गांज्या ताब्यात; पारनेर पोलीसांची कारवाई..


पारनेर -
पारनेर पोलिसांच्या छाप्यामध्ये गुणोरे येथे 12 लाख 45 हजार रुपये किमतीची गांजाची झाडे वजन 249.230 किलोग्रॅम 68 लहान मोठी हस्तगत पारनेर पोलिसांची मोठी कारवाई आरोपीचे नाव बाळू रामदास गोपाळे वय 30 वर्ष राहणार गुणोरे कारखिले मळा तालुका पारनेर दिनांक 12/7/2023 रोजी सदर घटना घडलेली आहे.

आरोपीचे शेती गट नंबर 31 मध्ये गुणोरे शिवार मधे सदर आरोपीला पारनेर पोलीसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. 

पारनेरचे नायब तहसिलदार गणेश आढारी, पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, फौजदार हनुमंत हनुमान उगले, कडूस, पोलीस हवालदार डहाळे, पोलीस नाईक सुधीर खाडे, पोलीस नाईक गहीनाथ यादव पोलीस नाईक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी सागर धुमाळ, मयूर तोरडमल सुरज कदम, सारंग वाघ अमित कडूस, पोलीस कॉन्स्टेबल चालक शेळके या पथकाने हि कारवाई केली असुन, पारनेर पोलिसांच्या छाप्यामध्ये मध्ये मिळालेला मुद्देमाल 12 लाख 45 हजार रुपये किमतीची गांजाची झाडे वजन 249.230 किलोग्रॅम 68 लहान मोठी झाडे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई यशस्वीरित्या करण्यात आली.

No comments:

Post a Comment