नगर शहरातील घटना; 5 जणांनी केली शिक्षकाला घरात घुसून मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

नगर शहरातील घटना; 5 जणांनी केली शिक्षकाला घरात घुसून मारहाण.

 नगर शहरातील घटना; 5 जणांनी केली शिक्षकाला घरात घुसून मारहाण.


अहमदनगर  -
केडगाव उपनगरातील भूषणनगर येथील संकल्प कॉलनीत राहणार्या शिक्षकाला 5 जणांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.


याबाबत सचिन रामकृष्ण बागल (वय 36, रा.संकल्प कॉलनी, भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सोमवारी (दि.10) रात्री शिक्षक बागल हे कुटुंबासह घरात असताना विशाल दत्तात्रय मेहेत्रे व त्याचे वडील दत्तात्रय मेहेत्रे (दोघे रा.अकोळनेर, ता.नगर) आणि त्यांच्यासमवेत 3 अनोळखी इसम बागल यांच्या घरात घुसले. यावेळी दत्तात्रय मेहेत्रे म्हणाले की, माझ्या मुलाच्या दवाखान्याचा आणि अपघात झालेल्या गाडीचा खर्च द्या,” त्यावेळी बागल म्हणाले, “या अपघातात माझी चूक नाही. तुमचा मुलगा निलेश हा माझ्या गाडीला आडवा येवून माझ्या गाडीचे नुकसान करुन गेला आहे.” याचा त्यांना राग आल्याने 5 जणांनी बागल यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. 143, 323, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment