सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 11, 2023

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.

 सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.


सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ममता शंकर भिल (वय 20, रा. मन्यारखेडा), असे मृत विवाहितेचे नाव आहे. मन्यारखेडा (ता. जळगाव) येथील ममता भिल यांचा विवाह शंकर भिल यांच्यासोबत झाला आहे.

लग्नानंतर विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ सुरू केला. संगनमत करून तिला मारहाणही केली. वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून गुरुवारी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांत विवाहितेचा पती शंकर सुरेश बागले, सासू रेखा सुरेश बागले, सासरे सुरेश रामदास बागले, नणंद सुरेखा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment