मंगळवारी साकतमध्ये ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, July 16, 2023

मंगळवारी साकतमध्ये ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन.

मंगळवारी साकतमध्ये ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन.
अहमदनगर : नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे मंगळवारी (दि. १८) सकाळी १० ते १२ यावेळेत  रामानाचार्य  ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे.
साकत गावचे मा. सरपंच तथा नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पाराजी चितळकर यांचे सुपुत्र  स्वर्गीय लंकेश पाराजी चितळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जय माता दी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पाराजी चितळकर, अनिता पाराजी चितळकर, शुभम पाराजी चितळकर, श्रुती लंकेश चितळकर, राजवीर लंकेश चितळकर, भाऊसाहेब चितळकर, पोपट चितळकर, शहाबाई चितळकर, गोरख चितळकर, विठ्ठल चितळकर, सुनीता कोळेकर, बेबी सोडणर, बापू चितळकर, मनोहर चितळकर, सुभाष चितळकर यासह आ. संग्रामभैय्या जगताप मित्र मंडळ व चितळकर परिवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment