नगर-कल्याण रोडवरील स्वामी समर्थ कॉलनी येथे कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 18, 2023

नगर-कल्याण रोडवरील स्वामी समर्थ कॉलनी येथे कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

 नगर-कल्याण रोडवरील स्वामी समर्थ कॉलनी येथे कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

कल्याण रोड भागाचा सर्वांगिण विकास करणार -महापौर रोहिणी शेंडगे.


नगर -
 गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रोड परिसरातील विविध विकास कामांना चालना मिळाली असून, त्या माध्यमातून प्रत्येक भागातील कामे मार्गी लागली आहे. नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्याबरोबर या भागाचा सर्वांगिण विकास करण्यात येत आहे. या भागात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे वसाहतींची संख्याही वाढत आहेत. या सर्वांना पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते, स्ट्रीट लाईट देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, नागरिकांनीही आपल्या भागातील कामांसाठी पाठपुरवा करणे गरजेचे आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागातील प्रश्न मार्गी लागत आहे. मीही या भागाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
प्रभाग क्र.8 नगर-कल्याण रोडवरील स्वामी समर्थ कॉलनी येथे महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नंदकिशोर सांगळे, अंकुश बनभेरु, अशोक नंदी, सुरेश मामड्याल, रोहिदास डावखर, कमलेश जैस्वाल, अमित वडे, अभिजित कांबळे, मोहन डहारे, विजय ढवळे, योगेश देशमुख, सरिता बनभेरु, उषा डावखर कमला तिवारी, अनिता सांगळे, ज्योती कांबळे, आरती पाटील, मीना डहारे, मिना मामड्याल, छाया वडे, प्रभावती जैस्वाल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासनाची पुर्तता करण्यात येत आहे. विविध विकास निधीतून कल्याण रोड भागातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. महापौर व सहकारी नगरसेवकांच्या समन्वयातील विविध कॉलनी, वसाहतींना मुलभुत सुविधा पुरविण्यात येत आहे. स्वामी समर्थ कॉलनीतील होत असलेल्या कामामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सभापती पुष्पाताई बोरुडे, सचिन शिंदे यांनी प्रभागातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या मागणीनुसार कामांना प्राधान्य देत ते प्रश्न सोडविले जात आहे. यापुढेही उर्वरित कामे मार्गी लावली जातील, असे सांगितले.
यावेळी सभापती गणेश कवडे यांनी प्रभागाच्या विकासासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नंदी यांनी केले तर आभार अंकुश बनभेरु यांनी मानले. रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment