लहान बाळाचे अपहरण करणारा तीन तासात गजाआड; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, July 16, 2023

लहान बाळाचे अपहरण करणारा तीन तासात गजाआड; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई..

लहान बाळाचे अपहरण करणारा तीन तासात गजाआड; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई..
चेतना कॉलनी येथील घटना; मुलगा आईकडे सुखरूप.
अहमदनगर :-साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन तासात गजाआड केले आहे.
याबाबत सविस्तर  हकीकत अशी की ,रविवारी दि.१६ जुलै रोजी दुपारी चेतना कॉलनी येथील रहीवासी असलेले फिर्यादी,  चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता.फिर्यादी रुम पाहून खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजुबाजुला पाहीले त्यांना मुलगा प्रतिक कोठेच मिळुन आला नाही. यावेळी त्यांनी आजु बाजुला विचारले असता की तेथील लोकांनी त्यांना  थोडया वेळापूर्वी ३०-३२ वर्षाचा एक इसम त्याला त्याचे बरोबर घेवून गेला असल्याचे सांगितले तेव्हा फिर्यादी यांनी लगेच ११२ नंबर वर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने माझे संमत्ती शिवाय घेवुन गेला असल्याची माहिती दिली. 
या घटनेचा फोन कंट्रोल वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि राजेंद्र सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील कर्मचारी यांनी घटनेबाबत तात्काळ माहिती घेतली असता त्यांना मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीत रीत्या फिरत असल्याचे माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता जेथे एक इसम हा त्याचे सोबत असलेला मुलगा पथकातील कर्मचारी यांना दिसला.लगेच फिर्यादी यांना तो दाखवला असता फिर्यादीने ओळखले कि हा त्यांचाच मुलगा प्रतिक आहे त्यावेळी त्याला घेवून फिरणाऱ्या संशयीत इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र बबन थोरात (रा.शेवगाव)  असल्याचे सांगीतले.  अधिक विचारपुस केली असता त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरजिनं ६२३/२०२३ भादवीक ३६३ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 
ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पो. अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पो. अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप,पोसई गायकवाड,पोहेकॉ नंदकुमार सांगळे,पोना.मिसाळ,पोकॉ. सानप,पोकॉ.सुरज देशमुख, पोकॉ.जयसिंग शिंदे,पोकॉ पठाडे व मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंड व पोशि.नितीन शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment