जामखेड पोलीस स्टेशन येथे डोणगाव येथील पाच अरोपी विरोध्दात पोक्सोचा गुन्हा दाखल... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

जामखेड पोलीस स्टेशन येथे डोणगाव येथील पाच अरोपी विरोध्दात पोक्सोचा गुन्हा दाखल...

 जामखेड पोलीस स्टेशन येथे डोणगाव येथील पाच अरोपी विरोध्दात पोक्सोचा गुन्हा दाखल... 


जामखेड -
तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. गावातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत  (1) आकाश दादासाहेब धनवे 2) दादासाहेब मारुती धनवे 3) कृष्णा दादासाहेब धनवे 4) विशाल प्रकाश मोरे 5) प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १२ रोजी शेतातुन जनावरांना चारापाणी करून आमचे राहते घरी आले. त्यावेळी माझी मुलगी ही रडत होती. त्यामुळे मी का रडत आहे, असे विचारले असता तिने सांगितले की, आज शाळा सुटल्यावर मी व माझ्या मैत्रिणी  यांचे सोबत आपल्या गावातील खंडोबाच्या मंदीरात पाया पडायला गेलो होतो. त्या ठिकाणी आकाश दादासाहेब धनवे याने माझा हात धरून ओढले व तु मला खुप आवडते असे म्हणाला तसेच आकाश याने, चार पाच दिवसा पूर्वी मला डोळा मारला होता.  ती खुप घाबरलेली होती.

काही वेळाने माझा नवरा घरी आल्यावर त्यांना  प्रकार सांगितला त्यानंतर सायंकाळी 07/30 वा. चे सुमारास मी माझा नवरा दीर निखील भिमराव मोरे तसेच सासरे भिमराव मोरे असे सर्वजण दादासाहेब धनवे यांचे घरी जाब विच्यारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी असलेले 1) दादासाहेब मारुती धनवे 2) कृष्णा दादासाहेब धनवे 3) विशाल प्रकाश मोरे 4) प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड असे सर्व जणांनी आमचे काही एक ऐकून न घेता हातात काठ्या घेऊन आमच्या अंगावर धावुन आले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 

आकाश दादासाहेब धनवे याने आज दि.12/07/2023 रोजी सायंकाळी 05/30वा चे सुमारास आमचे डोणगाव गावातील खंडोबा मंदिरात माझी मुलगी वय 12 वर्ष हिचा हात धरून तिला ओढुन तु मला खुप आवडते असे म्हणून तसेच त्यापुर्वी डोळा मारून तिचा विनयभंग केलेला आहे. दादासाहेब धनवे यांचे घरी जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आमचे काही एक ऐकून न घेता हातात काय घेऊन आमचे अंगावर धावुन आले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. करीता माझी (1) आकाश दादासाहेब धनवे 2) दादासाहेब मारुती धनवे 3) कृष्णा दादासाहेब धनवे 4) विशाल प्रकाश मोरे 5) प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.

No comments:

Post a Comment