BCCI news..मराठमोळ्या अजित आगरकर यांच्यावर बीसीसीआय कडून मोठी जबाबदारी… - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

BCCI news..मराठमोळ्या अजित आगरकर यांच्यावर बीसीसीआय कडून मोठी जबाबदारी…

BCCI news..मराठमोळ्या अजित आगरकर यांच्यावर बीसीसीआय कडून मोठी जबाबदारी…
भारताचा माजी जलतगती गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. अजित आगरकरची टीम इंडियाचा निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर याची मुलाखत घेतली, त्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याआधीही अजित आगरकरने या पदासाठी अर्ज केला होता, पण चेतन शर्मा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची निवड झाली आहे, पण टी-20 सीरिजसाठीच्या टीमची घोषणा झालेली नाही. या टीमची निवड अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

No comments:

Post a Comment