प्रवाशाला रस्त्यात थांबवून चार अनोळखी चोरट्यांकडून लुटमार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

प्रवाशाला रस्त्यात थांबवून चार अनोळखी चोरट्यांकडून लुटमार..

 प्रवाशाला रस्त्यात थांबवून चार अनोळखी चोरट्यांकडून लुटमार, अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल..


मुंबई येथे सिंहगड एक्सप्रेसने पुणे रेल्वे स्टेशन येथून जाण्याकरीता येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून पायी जात असलेल्या एका प्रवाशाला दोन जणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबून त्याला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार अनोळखी इसमा विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजेश लक्ष्मीनारायण तावरे (वय -54 ,राहणार -कल्याणी नगर ,पुणे )यांनी पोलिसांकडे आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,एक जुलै रोजी तक्रारदार राजेश टावरी हे येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून मुंबई येथे रेल्वेने जाण्यासाठी पुणे स्थानकाकडे जात होते.

त्यावेळी दोन मोटरसायकलवर आलेल्या 20 ते 22 वर्षाच्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून थांबवले. त्यानंतर त्यांच्याजवळ येऊन एका आरोपीने त्यांना लोखंड सारख्या दिसणाऱ्या कोणत्यातरी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील महागडा मोबाईल जबरदस्तीने काढून पळून नेला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एस डोंबाळे पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment