वाळवणे येथील तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक गंभीर जखमी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 4, 2023

वाळवणे येथील तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक गंभीर जखमी..

 वाळवणे येथील तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक गंभीर जखमी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात..


पारनेर -
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील एका तरुणावर सोमवारी मध्यरात्री एक वाजता धारदार शस्त्राने वार करण्यात आले असुन  यात ओंकार बाळासाहेब शिंदे वय-२२ राहणार वाळवणे ता. पारनेर नावाचा युवक  गंभीर  जखमी झाला आहे.  आरोपी धिरज पठारे,  पंकज धस याना सुपा  पोलिसांनी ताब्यात घेतले  आहे. 

याबाबत सुपा पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जखमी व दोन्ही आरोपी तिघेही वाळवणे येथील रहिवाशी असुन  जखमी ओंकार शिंदे  व आरोपी पंकज बाबासाहेब धस व धीरज निलेश शिंदे यांच्यात वाद झाला व त्या वादाचे  भांडणात रुपांतर  झाले या भांडणात ओंकार  शिंदे यांच्या पाठीवर, कंबरेवर व तोंडावर चाकुने वार केले असुन ही घटना सुपा वाळवणे रोडवरील वाळवणे  खिंडीत सोमवार व मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या आसपास घडली असुन  ही भांडणे  मद्य प्राशन करून झाली आहेत अशी प्राथमिक माहिती सुपा पोलिसांनी दिली आहे. 

घटनेची माहिती मिळताच  सुपा पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले  असुन  जखमीवर सुपा येथील खाजगी रुग्णालयात  उपचार  सुरू आहेत.  मंगळवारी दोघा आरोपीं विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका चौधरी हे  करत  आहेत.

वाढदिवसाच्या दिवशीच मित्रांकडूनच सपासप वार
सोमवार दि.३ रोजी ओंकार शिंदे याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी सुपा येथील एका हॉटेलमध्ये आठ ते दहा मित्र एकत्र आले. तेथे त्यांनी मद्य प्राशन केले.जेवण केल्यानंतर काही मित्र निघून गेले. तीघे घरी जाण्यासाठी सुपा येथून निघाल्यानंतर काही अंतरावर खिंड लागते. त्याठिकाणी हे तिघेही थांबले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यातूनच दोघांनी आपल्या मित्रावर सपासप वार केले असून मोटारसायकल गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

No comments:

Post a Comment