मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाची 2 बोटे तोडली; गळ्यावर वार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाची 2 बोटे तोडली; गळ्यावर वार..

 मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाची 2 बोटे तोडली; गळ्यावर वार..


वडिलोपार्जित आर्थिक मालमत्तेच्या वादातून पुण्यातील उंड्री परिसरातील होले वस्ती येथे एका सख्ख्या भावाने दुसऱ्या भावावर वार करत त्याच्या डाव्या हाताची दोन बोटे तोडली. तसेच त्याच्या गळ्यावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मयूर प्रकाश कड (३०, रा. उंड्री, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मयूरच्या तक्रारीवरून त्याचा भाऊ गणेश प्रकाश कड (रा. उंड्री, पुणे) यांच्यावर गुन्हा दखल करत कोंढवा पोलिसांनी अटक केली.


माहितीनुसार, तक्रारदार मयूर कड हे पालखीला गेलेले असताना आरोपीने त्यांची आई, पत्नी व मुले यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांनी याबाबतचा जाब आरोपी गणेश कड याला विचारला. त्या वेळी आरोपीने धारदार हत्यार आणून मयूरला ठार मारण्यासाठी वार केला. तो अडवताना मयूरच्या हाताची दोन बोटे तुटली. तसेच त्याच्या मानेवर डाव्या बाजूस वार केल्याने टाके पडून तो गंभीर जखमी झाला. एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक एस. दुर्गंध पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment