'त्या’ निकालामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी केला निषेध... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 7, 2023

'त्या’ निकालामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी केला निषेध...

 'त्या’ निकालामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी केला निषेध...

राजकारण राजकीय पातळीवर करावे पोटावर पाय देऊ नये, अशी भावना व्यक्त करून दिल्या घोषणा..


अहमदनगर -
अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मार्केट यार्ड येथील दोनशे गाळे पाडून दोन हजार पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर आणल्याचा आरोप करत  दिलीप सातपुते, शशिकांत गाडे,युवराज गाडे,संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांचा निषेध आज कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती  येथे व्यापाऱ्यांनी केला आहे तशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले.

मार्केट यार्ड मधील दोनशे व्यापारी गळ्या बाबत नुकताच कोर्टाने निर्णय दिला आहे. हे गाळे पाडण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर आता या प्रकरणात राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणाचा पाठपुरा करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी निषेध करत व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणू नये जे राजकारण करायचे आहे तुम्ही ते राजकीय पातळीवर करावे मात्र व्यापारांच्या पोटावर पाय देऊ नये अशी भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

मार्केट यार्ड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापाऱ्यांनी या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असताना राजकारणाच्या माध्यमातून अशा प्रकारे व्यापार उध्वस्त करणे हे कोणत्या राजकीय पक्षाचा अजेंडा आहे असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.

व्यापाऱ्यांना आता सरकार दरबारी न्याय मागवा लागेल व्यापारी पोट भरण्यासाठी जागा घेतो मात्र त्याच्यावर अन्याय होतेय असे या घटने मधून समोर येतोय अशा भावना ही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी नितीन शिंगवी,धनेश कोठारी,भरत पवार, प्रसाद बोरा, विशाल पवार, निनाद औटी, अभय लुनिया,आनंद चोपडा,भास्कर पवार,विशाल दाभाडे,बाळासाहेब दरेकर,गणेश कोठारी, नानासाहेब देशमुख, रितेश सोनीमंडलेचा, संदेश मुनोत, प्रकाश म्हस्के, शिवाजी आंबेकर, किरण दर्डा, 
व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष-राजाभाऊ कोठारी, मार्केट कमिटी संचालक-प्रेमराज बोथरा. आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment