अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 10, 2023

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू.

 अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू.


येरवड्यामधील कॉमर झोन रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे दुचाकीवरील परेश सुनील गलियाल (वय 26, रा महा. हौ. बोर्ड, येरवडा) याचा मृत्यू झाला आहे.


येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा अपघात झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार कॉमर्स झोनकडून मेंटल हॉस्पिटलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

रुग्णवाहिका येण्यासाठी विलंब झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुमारे तासभर बंद ठेवण्यात आली होती. अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत. 

No comments:

Post a Comment