पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार पाऊस.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार पाऊस..

 पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार पाऊस..


राज्यात मराठवाडा आणि विदर्थात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाहीय. त्यामुळे शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. मुंबई,कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

यादरम्यान गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यामध्ये काही भागात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.

राज्यात कुठे होणार पाऊस?

हवामान खात्याकडून पुढचे ४ दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.

No comments:

Post a Comment