पारनेर ग्रामीण पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपते : काशिनाथ दाते सर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 7, 2023

पारनेर ग्रामीण पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपते : काशिनाथ दाते सर.

 पारनेर ग्रामीण पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपते : काशिनाथ दाते सर.

नवीन टॅगो ऑटो रिक्षाचे केले वितरण!


पारनेर -
पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय पारनेर येथून बाळू कचरू शिंदे रा. महादेव गल्ली, पारनेर ता. पारनेर या संस्थेच्या सभासदास नवीन सीएनजी टॅगो प्रवासी वाहतूक ऑटो रिक्षाचे वितरण संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते झाले यावेळी ते बोलत होते. 

पारनेर येथील बाळू शिंदे अतिशय मेहनती असून त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनीडोर वाहनापासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली‌. मेहनत करून स्वतःचा प्रपंच उभा करण्याचे काम त्यांनी केले. आज त्यांची दोन्ही मुलं ऋषिकेश व विवेक ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत आहे. पारनेर ग्रामीण पतसंस्था वाहण व्यवसाय असो किंवा छोटे, मोठे उद्योजक यांना कर्ज वितरण करून त्यांच्या पाठीशी उभी राहते, तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.  तसेच पतसंस्थेमार्फत दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही केला जातो.  मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये शाहु महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त तहानलेल्या वन्य जिवांसाठी सिद्धेश्वर वाडी येथील रस्त्यावरील पाणवठ्यात पाणी सोडण्याची सोय ही पतसंस्थेमार्फत करण्यात आली होती. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात, पत्रकार सनी सोनावळे, वसुली अधिकारी संजय औटी, बाळासाहेब सोनवणे, नियाज राजे साहेब, सुनील रुईकर, अनिकेत रुईकर, संतोष गायकवाड, लक्ष्मण पानसरे, प्रतीक कापसे, नाना झरेकर, विशाल सैद, कु. आनंदी ऋषिकेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


मी १९९८ ला पहिली प्रवासी नवीन बजाज मिनीडोर घेतली. त्यावेळी माझे श्रद्धास्थान असलेले काशिनाथ दाते सर व सौ. आक्का यांचे शुभहस्ते वाहणाची पुजा केली. चिकाटीने वाहण व्यवसायातून आज स्वतःचे सहा टायर दोन अशोक लेलंड ट्रक माझ्याकडे असून माझे दोन्ही मुलं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात : बाळु कचरु शिंदे व्यवसायिक पारनेर 

No comments:

Post a Comment