3 लाख 33 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहन मुद्देमालासह जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 7, 2023

3 लाख 33 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहन मुद्देमालासह जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

 3 लाख 33 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहन मुद्देमालासह जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.


अहमदनगर -
कर्जत तालुक्यातील गुरव पिंप्री रोड, मिरजगाव येथे अवैधपणे विक्री करण्याच्या हेतूने साठवणुक केलेला अवैध मद्याचा साठा तसेच यासाठी वापरण्यात येणारे वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत जप्त केले असल्याची माहिती अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


गुन्हयांत एकूण 3 लक्ष 33 हजार 135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध मद्याची साठवणूक करणे व वाहतूक केल्याने संपत नरसय्या बोन्गोनी वय 47 वर्ष, रा. कृष्णाईनगर, गुरव पिंप्री रोड, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर या आरोपीस अटक करण्यात आलेले असून  आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे. या  प्रकरणाचा पुढील तपास  दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आर. पी. दांगट हे करीत असल्याचेही कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment