नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व महिलांचा विनयभंग करणाऱ्यास पारनेर पोलिसांनी केले गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 4, 2023

नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व महिलांचा विनयभंग करणाऱ्यास पारनेर पोलिसांनी केले गजाआड.

 नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व महिलांचा विनयभंग करणाऱ्यास पारनेर पोलिसांनी केले गजाआड.


पारनेर -
नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध पारनेर पोलीस करीत असताना गोपनीय माहिती मिळाली कि, नामदेव बाबाजी तांबे रा.गोरेगाव ता.पारनेर हा तालुक्यातील लोकांना तो विस्तार अधिकारी असुन आरोग्य खात्यात नोकरी भरतीसाठी जागा आहेत.असे सांगून त्यांच्या कडून आर्थिक लाभ मिळवून घेऊन त्यांची फसवणूक करत आहे.म्हणुन फसवणुक झालेल्या लोकांचा व नामदेव तांबे यांचा शोध घेत असताना नामदेव तांबे यास लोकांची फसवणूक करताना राळेगण सिद्धी गावात दक्ष नागरिकांनी त्यास पकडले असल्याची माहिती मिळाल्या वरून तात्काळ त्या ठिकाणी येऊन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

पारनेर पोलीसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पारनेर पोलीस स्टेशन नोकरीची आमिष दाखवून लोकांच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,संपतराव भोसले, पारनेर पोलीस स्टेशन निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली केले .त्यावरून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शन करून असे कृत्य करणार लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते .त्यानंतर अशा प्रकारची फसवणूक करणारे लोकांचा शोध घेत असताना  माहिती मिळाली की नामदेव बाबाजी तांबे रा.गोरेगाव ता. पारनेर हा पारनेर तालुक्यातील लोकांना तो विस्तार अधिकारी असून आरोग्य खात्यात नोकरी भरतीसाठी जागा आहेत असे सांगून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवून घेऊन त्यांची फसवणूक करत आहे .म्हणून फसवणूक झालेल्या लोकांचा व नामदेव तांबे यांचा शोध घेत असताना नामदेव तांबे यास लोकांची फसवणूक करताना राळेगण सिद्धी गावात दक्ष नागरिकांनी त्याच पकडले असल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले आहे. नामदेव बाबाजी तांबे यांनी पारनेर तालुक्यातील सात ते आठ लोकांना नोकरीच्या आमिष तसेच वेगवेगळ्या वस्तू मिळवून देण्याची आमिष दाखवून त्यांच्याकडून सुमारे २लाख २९ हजार रुपयांचे स्वीकारून त्याची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच एका महिलेस केंद्र शासनाचे आरोग्य विभागात क्लर्क पदासाठी जागा असल्याचे भासवून तिची आर्थिक फसवणूक करून तिची सदर विभागात निवड झाली असून तिची वैद्यकीय तपासणी करायची आहे .असे सांगून तिला एका कार्यालयाचे वरील मजल्यावर खोलीत नेऊन तिचा विनयभंग  केला आहे.म्हणून त्याच्यावर पारनेर पोलीस स्टेशनला दि.३०/६/२०२३ रोजी गु. र. नं. ६०३/२०२३ भादवी कलम १७०,४२०,३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .वरील कारवाई साठी मा. पो.अ. राकेश ओला, अ.पो.अ, प्रशांत खैरे ,पो.अ. नगर ग्रामीण संपतराव भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले ,पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे ,पो. हे. कों. जालिंदर लोंढे ,शिवाजी कदम ,गहिनीनाथ यादव, विवेक दळवी ,सुरज कदम ,सारंग वाघ ,सागर धुमाळ,अनिल रोकडे , या पथकाने केली आहे.
  
तालुक्यातील जनतेला आव्हान करण्यात येते की सदर व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केलेली आहे अशा प्रकारची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा.

No comments:

Post a Comment