पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 24, 2023

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी.

 पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी.


अहमदनगर :
शेंडी (ता. नगर )शिवारातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासात शोध एमआयडीसी पोलिसांनी लावला असून अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या हाती स्वाधीन केले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक २२ रोजी सकाळी ०९/३० वा चे सुमारास देठे वस्ती शेंडी येथून त्यांची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेले असल्याची फिर्याद रविवारी (दि. २३)  शेंडी येथील फिर्यादी यांनी दिली होती. 

या  फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना सदर अल्पवयीन मुलगी ही शिरुर (जि पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. यानुसार सपोनि. सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन सदर अल्पवयीन मुलीचा शिरुर येथून शोध घेवून  तिचे आईवाडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोसई चाहेर हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,  अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, पोसई योगेश चाहेर, पोकॉ.जयशिंग शिंदे, पोकों किशोर जाधव, पोकों सुरज देशमुख पोकों नवनाथ दहिफळे पोकों प्रशांत धुमाळ यांचे पथकाने केली.

No comments:

Post a Comment