अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 3, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक.

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक.


छत्रपती संभाजीनगर :
 अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला मंगळवारी (ता. २७) रात्री छावणी पोलिसांनी अटक केली. अजय रमेश अंभोरे (वय २५, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी बुधवारी (ता. २८) दिले.

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानूसार, २८ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडिता ही कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांना मिळालेल्या माहिती आधारे आरोपी अजय अंभोरे याला अटक केली. आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता मनिषा गंडले यांनी युक्तीवाद केला.

No comments:

Post a Comment