विवाहितेला पळवून नेत अत्याचार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 3, 2023

विवाहितेला पळवून नेत अत्याचार..

 विवाहितेला पळवून नेत अत्याचार, गर्भपातास भाग पाडले..


शहरातील २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत मुंबई, जळगाव व फैजपूर येथील लॉजवर नेऊन अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली. मात्र आरोपीने गर्भपात करण्यास भाग पाडून नंतर लग्नाला नकार दिला. तिची फसवणूक केली. तिला बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी २६ वर्षीय विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सर्फराज सईद खान (२४, रा. तहानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्या दोघांचे संबंध होते. त्याने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ करत आहेत.

No comments:

Post a Comment