घरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 4, 2023

घरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल.

 घरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल.


छत्रपती संभाजीनगर :
 कुटुंबीय झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरातून पहाटे बेपत्ता झाली. हा प्रकार पहाटे तीन वाजेदरम्यान बाळापूर फाटा परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून मुकूंदवाडी ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परी शंकर बलवाणी (१७, रा. बाळापूर फाटा) असे त्या बेपत्ता मुलीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानीशंकर बलवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जून रोजी बेपत्ता परी हिने कुटुंबीयांसोबत टीव्ही पाहिली, सर्वजण झोपल्यानंतर फिर्यादीची मोठी मुलगी पाणी पिण्यासाठी उठली असता, तिला परी दिसली नाही.

तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत. यासंदर्भात सदर मुलीच्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध करण्यास पालकांनी संमती दिल्याचे तपास अधिकारी श्री. बचाटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment