आ. नीतेश राणे यांनी घेतली ओंकार भागानगरे कुटुंबीयांची भेट; आ.राणे म्हणाले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 6, 2023

आ. नीतेश राणे यांनी घेतली ओंकार भागानगरे कुटुंबीयांची भेट; आ.राणे म्हणाले..

 आ. नीतेश राणे यांनी घेतली ओंकार भागानगरे कुटुंबीयांची भेट; आ.राणे म्हणाले..


अहमदनगर -
ओंकार उर्फ गामा भागानगरे याच्या कुटुंबीयांची भाजप आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी नगरमध्ये भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई   होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. काही दिवसांपूर्वीच ओंकार भागानगरे याची बालिकाश्रम रस्त्यावर तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा यांच्यासह त्यांना मदत करणार्‍या चार जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार नीतेश राणे हे श्रीगोंदे येथील मोर्चासाठी नगर जिल्ह्यात आले असता, त्यांनी नगर शहरात येऊन भागानगरे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. घटनेची व पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेऊन या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले.

No comments:

Post a Comment