14 गुंठे शेतीच्या वादातून हाणामारी;‎ एकाचा मृत्यू‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 6, 2023

14 गुंठे शेतीच्या वादातून हाणामारी;‎ एकाचा मृत्यू‎..

 14 गुंठे शेतीच्या वादातून हाणामारी;‎ एकाचा मृत्यू‎..


रायपूर येथे अवघ्या १४ गुंठे‎ जमिनीच्या वादातून झालेल्या ‎हाणामारीतील‎ ‎ गंभीर जखमी‎ ‎ भिकन खंडू‎ ‎ घिटरे या‎ ‎ शेतकऱ्याचा‎ ‎ बुधवारी पहाटे‎ ‎ पाच वाजेच्या‎ ‎ सुमारास‎ उपचारादरम्यान मृत्यू झाला.‎ याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात‎ आधीच नऊ जणांविरोधात गुन्हा‎ दाखल झालेला असल्याने आता कलम वाढवून त्यांच्यावर खुनाचा‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ दरम्यान, बुधवारी या घटनेतील दोन‎ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले‎ असून इतर आरोपींचा पोलिस शोध‎ घेत आहेत.

अवघ्या १४ गुंठे‎ जमिनीसाठी तब्बल ३५ वर्षे‎ न्यायालयात प्रकरण चालले. शेवटी‎ निकाल लागला. ज्यांच्या बाजूने निकाल लागला, त्यांना २६ जून‎ रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान‎ शासकीय मोजणी करून सरकारी‎ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताबा‎ देण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्यांच्या‎ विरोधात निकाल गेला त्यांनी भिकन‎ घिटरे यांच्या डोक्यात लोखंडी‎ अँगल मारून गंभीर जखमी केले‎ होते.‎

भानुदास फकिरराव घिटरे, ज्ञानेश्वर एकनाथ घिटरे, एकनाथ फकिरराव‎ घिटरे, गंगाधर फकिरराव घिटरे, यशवंत देविदास घिटरे, देविदास फकिरराव‎ घिटरे, शुभम देविदास घिटरे, बिराबाई, वर्षा घिटरे (सर्व रा. रायपूर, ता.‎ गंगापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.‎

No comments:

Post a Comment