कोतवाली पोलिसांची कारवाई; कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणारी टोळी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

कोतवाली पोलिसांची कारवाई; कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणारी टोळी जेरबंद.

 कोतवाली पोलिसांची कारवाई; कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणारी टोळी जेरबंद.

आरोपींकडून एक लाख 11 हजाराचा मुद्देमाल हस्तगत, महिनाभरात चार टोळ्या जेरबंद..


अहमदनगर -
कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन असून, चौथा आरोपी सोहेल महेमुद खान (वय 21 वर्षे, रा. पंपींग स्टेशन, आलगीर, भिंगार, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी मोटरसायकल असा एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी सोहेल महेमुद खान याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन पुढील तपास करत आहेत.


रोहिदास दादाराव रूमाले (वय 21 वर्षे रा. रहाटी, ता.दिग्रस, जि.यवतमाळ) व त्यांचा मामेभाऊ प्रविण गव्हाणे हे दोघे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणीसाठी दौंड येथे जात असताना यवतमाळ येथून दि.1 जुलै रोजी पहाटे पाच वाजता माळीवाडा बसस्थानकावर बसणे आले होते.  माळीवाडा बसस्थानक  येथून पायी रेल्वेस्टेशनकडे जात असताना मल्हार चौकातील आयकॉन पब्लिक शाळेसमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून रोहिदास दादाराव रूमाले यांचा वनप्लस कंपनीचा मोबाईल व हजार रुपये काढून घेतले व प्रविण गव्हाणे यांना चाकुचा धाक दाखवून दोनशे रुपये काढून घेतले होते. रोहिदास रूमाले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 
घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला आदेश दिले होते. कोतवाली पोलिसांनी तपास करून या गुन्हातील चार जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम, एव्हिएटर मोपेड मोटार सायकल (एमएच 16 बीडब्लु 7743) व पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच 16 एबी 3594) या दोन गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल असा एक लाख 11 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, सुखदेव दुर्गे, पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख,  तेहसिन शेख, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाडे,  याकूब सय्यद,  सुजय हिवाळे,  कैलाश शिरसाठ, सोमनाथ राऊत,  सागर मिसाळ,  अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment