अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात; नगर तालुका पोलिसांची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 4, 2023

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात; नगर तालुका पोलिसांची कारवाई.

 अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात; नगर तालुका पोलिसांची कारवाई.


अहमदनगर :
वाळकी (ता. नगर )येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मागील एक वर्षापासून फरार असणारा आरोपी पिडीत मुलीसह नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नगर  नगर तालुका पोलीस स्टेशनने ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर  हकीकत अशी की, वाळकी येथील पिडीत महिलेने दिनांक 19/9/2022 रोजी,तिच्या मुलीचे कोणीतरी आज्ञात इसमानी अपहरण केलेले आहे अशा मजकुराची फिर्याद नगर ता. पोस्टे येथे देण्यात आलेली होती.

या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यांना या गुन्ह्यासंदर्भात तपास करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार याचे पथक काढुन आरोपीचा शोध घेण्याकामी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, वसई-विरार येथे जावून तपास केला होता परंतु आरोपी व पिडीत अल्पवयीन मुलगी मिळून येत नव्हती सदर पिडीत मुलीचे आई वडील हे वारंवार तात्कालीन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून मुलीचा शोध घेणेकामी विनंती करीत होते.

त्यानंतर  पोलीस अधीक्षक राकेश ओला  यांना पिडीत मुलीच्या आई, वडील व तिचे नातेवाईक यांनी  तपास होण्याची विनंती केली, त्यानुसार  पोलीस अधीक्षक  राकेश ओला यांनी सपोनि.शिशिरकुमार देशमुख यांना सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार सपोनि.शिशिरकुमार देशमुख यांनी पोउनि. युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ.सुभाष थोरात, पोकॉ.कमलेश पाथरुट, राजु खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसींग यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार याने आरोपीचा शोध घेणेकामी बदलापूर, पनवेल, मुंबई येथे जावून चौकशी केली त्यादरम्यान पथकाला माहिती भेटली की आरोपी हा सोशल मिडीयाचा वापर करीत त्यानुसार सदर पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोउनि सचिन रणशेवरे व पोकॉ राहूल गुंडू यांचे मदत घेवून त्याचे तांत्रीक विश्लेषन करुन आरोपी हा काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथे वास्तव करीत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सदर पथकाने  काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे जावून सदर आरोपीचा व पिडीत मुलीचा शोध घेतला असता आरोपी व पिडीत मुलगी त्यांचे नाव बदलून एका शेतामध्ये कामगार म्हणून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाथकाने त्या शेतात जावून पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे सुहास घनश्याम बोठे वय २२ वर्षे रा. वाळकी ता.जि. अहमदनगर यास ताब्यात घेतले आहे. पिडीत मुलगी हिस बालकल्याण समिती, अहमदनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. आहे. व आरोपीस  न्यायालयात हजर  केले असता न्यायालयाने  ५ दिवसांची पोलीस कोठडी दिलीअसून पुढील तपास पोउनि युवराज चव्हाण  हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक  प्रशांत खैरे,   उप विभागीय पोलीस अधिकारी  संपतराव भोसले, सपोनि शिशिरकुमार देशमुख,  पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग,  पोउनि सचिन रणशेवरे,  सायबर पोस्टे, पोहेकॉ.सुभाष थोरात, पोकॉ.कमलेश पाथरुट,  पोकॉ.राहूल गुंडू, सायबर पोस्टे पोकॉ.राजु खेडकर, पोकॉ.नितीन शिंदे, पोकॉ.संभाजी बोराडे, पोकॉ.विक्रांत भालसींग यांच्या पथकाने केलेली आहे.

No comments:

Post a Comment