रोड रॉबरी करून म्हशींसह पिकअप पळविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसाची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 4, 2023

रोड रॉबरी करून म्हशींसह पिकअप पळविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसाची कारवाई.

 रोड रॉबरी करून म्हशींसह पिकअप पळविणारा जेरबंद. 

एमआयडीसी पोलिसाची कारवाई.


अहमदनगर -
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत रोड रॉबरी करुन 03 म्हशीसह पिकअप पळविणार्‍या गुन्हेगारांच्या टोळीतील एका सराईत आरोपीस बीड येथून अटक करून त्याच्याकडून 5,10,000/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.  ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय. डी. सी. पोलीसांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एम.आय.डी.सी पोलीस ठाणे, अ.नगर येथे दिनांक-17/06/2022 रोजी फिर्यादी दिनेश महादेव मोरे, वय-23 वर्षे, धंद ड्रायव्हर, मु.पो. राहु, ता. दौंड, जि.पुणे यांनी फिर्याद दिली होती की, फिर्यादी हे दौड येथुन घोडेगाव जनावरांचे बाजारात एकुण च म्हशी या पिकअपमध्ये भरुन विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना त्याच दिवशी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास न औरंगाबाद रोड जेऊर शिवारात, हॉटेल शिव जवळ, ता. जि. अ.नगर. येथे एकुण 3 आरोपीत यांनी फिर्यादीच्या पिकअप मार मोटार सायकलवर येवून त्यांचे ताब्यातील मोटार सायकल फिर्यादीचे पिकअपला आडवी लावून त्यांना धारदार हत्याराचा धाक दाखवून शिवीगाळ करुन फिर्यादीजवळ असलेले पिकअप, एकुण 03 म्हशी ही जनावरे, तीन मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्कम रुप 2,000/- असा मुददेमाल चोरुन नेलेला होता.

त्यापकी यापुर्वीच म्हशी चोरणारे दोन व म्हशी विकत घेणारा एक असे एकुण ती आरोपी यापुर्वी अटक करण्यात आलेले असुन त्यांचा एक साथीदार मुख्य आरोपी नामे-समाधान बाबुराव खिंडकर, र बेलवाडी, ता. जि. बीड हा सराईत आरोपी असुन तो आजपावेतो फरार होता.या गुन्हयाचा तपास करत असताना सदर गुन्हयातील फरार आरोपीत याचा शोध घेतला असता तो बीड शहर परिसरात असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने त्यास अटक करण्यासाठी प्रभारी अधिकारी सपोनि. राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सी.बी. हंडाळ, पोशि,  गजानन गायकवाड, पोशि.  किशोर जाधव, होमगार्ड  गणेश सुरेश वाघ यांचे तपास पथक रवाना करण्यात आलेले होते. त्यावेळी पोलीस पथकाने पिंपळनेर बीड येथे जावुन आरोपीची  गोपनीय माहीती काढुन त्यास ताब्यात घेवून त्यास अटक केलेली असुन त्याचेकडुन पिकअपसह 3 म्हशी असा 5,10,000 /- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरोधात अ.नगर, बीड, पुणे येथे विविध गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राजेंद्र सानप, पो.उप.नि. चांगदेव हंडाळ, पोकों गजानन गायकवाड, पोशि  किशोर जाधव, पो. शि भगवान वंजारी, पोशि.ज्ञानेश्वर तांदळे, पोशि. सुरज देशमुख,  होमगार्ड गणेश सुरेश वाघ, मोबाईल सेल मपोशि रिंकु माढेकर, पोकों नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment