एमआयडीसी पोलिसांची कारवाई; एमआयडीसी परिसरातील मोटरसायकल व पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी जेरबंद.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; एमआयडीसी परिसरातील मोटरसायकल व पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी जेरबंद..

 एमआयडीसी पोलिसांची कारवाई; एमआयडीसी परिसरातील मोटरसायकल व पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी जेरबंद.


अहमदनगर -
एमआयडीसी परिसरातील मोटारसायकली व शेतकन्यांच्या पाण्याच्या मोटारीची चोरी करणारी टोळी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली असून 5,70,000 रु. किमतीच्या तीन मोटारसायकली व दोन पाण्याच्या मोटरी व गुन्हयात वापरलेला टाटा एस कंपनीचा टेम्पो चोरट्यांकडून जप्त केला आहे.

01 जुलै रोजी फिर्यादी  सोमनाथ भानुदास गिते वय 27 वर्ष र निर्मलनगर पाईपलाईन रोड अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दिनांक 30 जून रोजी रात्री करा ते  1 जुलै रोजी सकाळी 7 वा थे दरम्यान अहमदगर एमआयडीसी येथिल एक्साईड बॅटरी कंपनीच्या मोकळया पार्किंग मधुन त्यांची मोपेड मोटारसायकल क्र एम एच 16 सी के 1329 हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी  अविष्कार सुभाष वाघ  शुभम ज्ञानदेव काळे  गौरव उर्फ अक्षय शंकर चव्हाण सर्व राहणार पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यांनी केल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन वरील आरोपीना पिंपळगाव माळवी परीसरातून शिताफिने पकडले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अविष्कार सुभाष वाघ वय 22 वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अ नगर शुभम ज्ञानदेव काळे वय 27 वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अ नगर  गौरव उर्फ अक्षय शंकर चव्हाण वय-22 वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अ नगर असे सांगीतले. त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयात चोरी गेलेली मोपेड मोटारसायकल क्रः एम एच 16 सी के 1329 हि आरोपी नामे शुभम ज्ञानदेव काळे वय 27 वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर याचे ताब्यात मिळून आली. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतून चोरी केलेल्या दोन विना नंबर स्पेलंडर मोटारसायकली व शेतक-याच्या शेतातुन चोरलेल्या दोन पाण्याचे मोटारसायकली व गुन्हयात वापरलेला टाटा एस कंपनीचा टेम्पो असा एकुण 5,70,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खरे अपर पोलीस अधीक्षक. संपत भोसले. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र सानप, पोपट टिक्कल  विष्णु भागवत, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सुरेश सानप, सुरज देशमुख, जयशिंग शिंदे, यांचे पथकाने केलेली आहे.


No comments:

Post a Comment