पोलिस कर्मचाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

पोलिस कर्मचाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार..

 पोलिस कर्मचाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार..


पुणे -
शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याने २४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या पीडित महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अन्य एका पोलिस कर्मचाऱ्यासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बी.टी. कवडे रस्त्यावरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेलसमोर घडली. सुमारे तीन वर्षांपूर्वीपासून एक जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी एका २४ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. 

त्यावरून पोलिस कर्मचारी कादीर कलंदर शेख, पोलिस कर्मचारी समीर पटेल, दोन अनोळखी व्यक्तीसह एका महिलेविरूध्द अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment