स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दोन महिने फरार असलेले सराईत दोन आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 12, 2023

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दोन महिने फरार असलेले सराईत दोन आरोपी जेरबंद.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दोन महिने फरार असलेले सराईत दोन आरोपी जेरबंद.


अहमदनगर -
घरात स्वयंपाक करत असताना पाणी पिण्याच्या बहाना करून अल्पवयीन मुलीचे हात पाय बांधून तिच्या तोंडात रुमाल कोंबून बलात्कार करणार्‍या दोन महिन्यांपासून  फरार असणार्‍या दोन नराधमांना केडगाव चौफुला (ता.दौंड) येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग, कर्जत हे करीत आहे. आरोपी राजु समशुद्दीन शेख. व अजीज समशुद्दीन शेख हा दोघे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत.
सदर बातमीची हकिगत अशी की, 7 एप्रिल रोजी दुरगांव, ता. कर्जत येथील पिडीत अल्पवयीन मुलगी स्वयंपाक घरात काम करत असताना आरोपी  राजु शेख व अजीज शेख यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करून पिडीत मुलीचे दोन्ही हात बांधुन तोंडात रुमाल कोंबुन तिचे इच्छे विरुध्द जबरीने संभोग केला व सदर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझी आई व भावाला मारुन टाकीन अशी धमकी दिली होती. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भादविक 376,  प्रमाणे आरोपी विरुध्द पोक्सो कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला  अहमदनगर यांनी घटना ठिकाणास समक्ष भेट देवुन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस  पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
वरील आदेशान्वये दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव ,पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन मखरे, अतुल लोटके, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, फुरकान शेख,पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू ,रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पथक माहिती घेत असताना पथकास गुन्ह्यातील आरोपी वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलुन औरंगाबाद, उस्मानाबाद व पुणे असे जागा बदलुन राहतात अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने आरोपींचा पुणे जिल्ह्यात तपास करता असताना  आहेर  यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, दुरगांव, ता. कर्जत येथील बलात्काराचे गुन्ह्यातील दोन आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवुन केडगांव चौफुला, ता. दौंड, जिल्हा पुणे येथील खुडगांव शिवारात एका झोपडीमध्ये राहतात अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
आहेर यांनी लागलीच पथकास रवाना केले. पथकाने केडगांव चौफुला, ता. दौंड, जिल्हा पुणे परिसरात जावुन दोन दिवस वास्तव्य करुन शेतकरी व शेत मजुर असे वेशांतर करुन खुडगांव शिवारात आरोपी राहत असलेल्या झोपडी जवळ जावुन पाहणी केली असता बातमीतील वर्णना प्रमाणे दोन इसम बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच झोपडीत अचानक प्रवेश करुन दोन संशयीत इसमांना जागीच ताब्यात घेतले.  त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव  राजु समशुद्दीन शेख वय 31 व  अजीज समशुद्दीन शेख वय 28 दोन्ही रा. थोटेवाडी, दुरगांव, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले.
ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment