वडनेरकरांचे उपोषण मागे; सुजित झावरे यांची मध्यस्थी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 13, 2023

वडनेरकरांचे उपोषण मागे; सुजित झावरे यांची मध्यस्थी...

 वडनेरकरांचे उपोषण मागे; सुजित झावरे यांची मध्यस्थी...


पारनेर -
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनाबाबत ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत सरपंच लहू भालेकर, उपसरपंच नंदू भालेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले होते.
दरम्यान वडनेर हवेली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी ९९ लाखचा निधी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. व काम सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे परंतु एक महिना उलटूनही संबंधित ठेकेदाराने अजून योजनेचे काम सुरू केले नाही. काम पूर्ण करण्याचा कालावधी हा बारा महिन्याचा आहे. आता ठेकेदाराने काम सुरू केले नाही तर संबंधित निधी हा मागे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याचे प्रशासनाने आदेश द्यावेत किंवा ठेकेदार बदलून काम सुरू करावे या मागणीसाठी वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर व उपसरपंच नंदू भालेकर यांनी जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी उपोषण सुरू केले होते.
यावेळी मा.कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अहमदनगर यांचे लेखी आश्वासन पत्र घेतल्या नंतर सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मा.खासदार यांच्या उपस्थितीत बैठक होईपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी राहुल पाटील शिंदे, गणेश शेळके, सुकाशेठ पवार, स्वप्नील घुले, भरत गट, राहुल पवार, ओमकार मावळे, संतोष सरोदे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment