छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल; पारनेर तालुका कडकडीत बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 12, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल; पारनेर तालुका कडकडीत बंद.

 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल; पारनेर तालुका कडकडीत बंद.


पारनेर -
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसीम सय्यद या तरुणाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व  छत्रपती शिवाजी महाराजांची  बदनामी केली. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंदूवादी संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला असे असूनही पाबळ येथील वसीम सय्यद तरुणीने केलेल्या कमेंट बाबत समाज माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.आक्षेपार्ह पोस्ट चा निषेधार्थ संपूर्ण पारनेर व्यवसायिक व्यापारी सर्वांनी बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.
यासंदर्भात फिर्याद संदीप चंद्रकांत कावरे यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे दैवत व प्रेरणास्थान असून त्यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अश्लील व अपशब्द वापरून वसीम बाबा सय्यद याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील पोस्ट करणाऱ्या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्याबाबत पारनेर येथील हिंदूवादी तरुणांनी मागणी करत पोलीस स्टेशन समोर ठाण मांडले व तत्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी केली यामध्ये तुषार औटी आबा देशमुख गणेश कावरे अक्षय चेडे ऋषि गंधाडे स्वप्निल पुजारी रायभान औटी धीरज मंहाडूळे सतीश म्हस्के संभाजी मगर अनिकेत औटी आदी उपस्थित होते.
पुढील तपास संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले करत आहेत.
शिवाजी महाराजांचा संदर्भात समाज माध्यमांद्वारे अक्षपार्य कमेंट करणाऱ्या तरुणांनी अळकुटी येथे येऊन माफी मागितली मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट बाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून अळकुटी सह पारनेर तालुका  बंद ठेवण्याचा निर्णयावर हिंदूवादी तरुण ठाम असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment