अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे केडगाव उपनगरातील बंद अवस्थेत असलेले मंगल कार्यालय चालू करणेबाबत.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे केडगाव उपनगरातील बंद अवस्थेत असलेले मंगल कार्यालय चालू करणेबाबत..

अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे केडगाव उपनगरातील बंद अवस्थेत असलेले मंगल कार्यालय चालू करणेबाबत..

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे केडगाव उपनगर येथे भाग्योदय मंगल कार्यालय आहे. भाग्योदय मंगल कार्यालय यापूर्वी आपण शुभविवाह व इतर कार्यक्रमांसाठी कमी दरामध्ये गोरगरीब नागरिकांना उपलब्ध करुन देत होतो. परंतु सदरील मंगलकार्यालय गेल्या दिड ते दोन वर्षांपासून म्हणजेच कोळोना काळापासून बंद असुन निर्जन अवस्थेत आहे. सदरील मंगल कार्यालय बंद असल्यामुळे या ठिकाणी गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगल कार्यालय बंद असल्यामुळे उपनगरातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या मुलांच्या शुभविवाहासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी नाईलाजास्तव खाजगी मंगलकार्यालये अवाजवी भाडे भरुन घ्यावी लागतात. त्यामुळे केडगांव उपनगरातील गोरगरीब नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदरील मंगलकार्यालय महानगरपालिकेने चालु चालु केल्यानंतर महानगरपालिकेस आर्थिक उत्पन्नही मिळण्यास मदत होईल.
तरी केडगांव उपनगरातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या मुलांच्या शुभविवाहासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी भाग्योदय मंगल कार्यालय चालु करुन सहकार्य करावे, ही विनंती.

आपले विश्वासु  - ज्ञानेश्वर (अमोल) शिवाजी येवले, विजय मोहन पठारे, श्रीमती. सुनिता संजय कोतकर, श्रीमती. शांताबाई शिंदे :

No comments:

Post a Comment