गुजरात येथील सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांकडून अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

गुजरात येथील सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांकडून अटक.

गुजरात येथील सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांकडून अटक.

अहमदनगर: गुजरात राज्यातुन एमआयडीसी परीसरात चोरी करण्याच्या इरादयाने आलेल्या 
सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
याबातचे सविस्तर वृत्त असे की, दि. 19 जून रोजी रात्रीच्या दरम्यान रात्रगस्त  पेट्रोलिंग करीत असतांना शेंडी बायपास रोड शेंडी शिवार येथे एक इसम स्वतःचे अस्तित्व लपवुन एका टपरीचे आडोशाला लपवुन बसलेला दिसला त्यावेळी गस्ती साठी  नेमलेल्या पोलीस अमंलदाराला त्याचा संशय आल्याने ते त्यास पकडण्याकरीता त्याचे दिशेने जावु लागले असता सदर आरोपी हा पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला त्यावेळी रात्रगस्त करीता नेमलेल्या पोलीस अमंलदारांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव आकाशकुमार किरीटभाई पटेल वय ३० वर्ष रा. कोठयु फल्यु वराड ता. बारदोली जि. सुरत गुजरात असे सांगीतले. व तो मालाविरुदध गुन्हा करण्याचे इरादयाने स्वतःचे अस्तित्व लपवतांना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नंबर ५३३ / २०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे आकाशकुमार किरीटभाई पटेल हा सराईत गुन्हेगार असुन 'त्याचेवर गुजरात येथे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक
प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले  यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप , पोहेकॉ महमंद शेख, पोहेकॉ गिरवले, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ. नवनाथ दहिफळे, पोकॉ शुभम सुद्रुक यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment