नगर मधील घटना; 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

नगर मधील घटना; 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या.

 नगर मधील घटना; 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या.


नगर -
वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच 25 वर्षीय युवकाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी (दि.21) पहाटे घडली. गोरख शांतीलाल कांबळे असे या मयत युवकाचे नाव आहे.
गोरख कांबळे हा युवक अल्युमिनीयमच्या विंडो तयार करण्याचा व्यवसाय करत होता. मंगळवारी (दि.20) त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. बुधवारी (दि.21) पहाटे 2.45 च्या सुमारास त्याने त्याच्या व्हाटसअप स्टेटस वर वाढदिवसाचा शुभेच्छा देणार्‍यांचे आभाराची पोस्ट टाकली होती. तसेच रात्री त्याने काही मित्रांना आपण उद्या सकाळी लवकरच मोहोटा देवीला दर्शनासाठी जावू असे सांगितले होते. त्यामुळे पहाटे 5.30 च्या सुमारास काही मित्रांनी त्याला फोन लावले मात्र त्याने फोन उचलले नाही.
त्यामुळे मित्र त्याला घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. तर घराच्या दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे त्याला हाका मारल्या पण त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मित्रांनी खिडकीतून आत डोकावले असता तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असलेला दिसला.त्याच्या मित्रांनी व परिसरातील नागरिकांनी त्याला खाली घेत तातडीने नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
मयत गोरख कांबळे याच्या पश्चात आई, वडील असून तो एकुलता एक होता. जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर दुपारी खंडाळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

No comments:

Post a Comment