पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी वाळुज येथे पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी वाळुज येथे पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार.

पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी वाळुज.येथे पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार.
अहमदनगर - दिनांक  १३/०६/ २०२३ रोजी पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी.वाळुज येथे पद्मभुषण आदरणीय आण्णा हजारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली,यावेळी पर्यावरण प्रेमी पोपटराव रसाळ यांनी वातावरणामधील होणारे बदल,भविष्यात मानवी जीवनाला घातक ठरतील, म्हणून जास्तीत जास्त पर्यावरण देशी झाडे लावा व संवर्धन करा असे उपस्थित नागरिकांना आव्हान केले, व एक झाड मानवाला कशा पद्धतीने उपयुक्त असते व एका झाडाची किंमत नागरिकांना समजावून सांगितली व पर्यावरण संवर्धन विषय जागृती निर्माण केली तसेच आधार व्यसनमुक्ती सामाजिक सेवाभावी संस्था व मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान व महिला बचत गट यांच्या विद्यमाने पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी.वाळुज छत्रपती संभाजीनगर येथे प्रमुख पाहुने श्री आनिल गायकवाड साहाय्यक पोलीस आयुक्त.उद्घाटक श्री आविनाश आघाव पोलीस निरीक्षक.यांच्या मार्गदर्शनला खाली हा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी व्यसनमुक्ती शिबिरास सुरुवात झाली यावेळी पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी.वाळुज येथे वृक्षारोपन करून. व्यसनमुक्ती जनजागृती चे पोस्टर प्रदर्शन भरून व्यसनमुक्ती वर व्याख्यान देऊन .पोलिस स्टेशन कर्मचारी व नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती व पर्यावरण जनजागृती तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम करणारे पोस्टर हातात घेऊन व्यसनमुक्ती व पर्यावरण जनजागृती करण्यात आली यावेळी आधार व्यसनमुक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व गुणवंत कामगार श्री प्रदीप माळी यांनी पोस्टर प्रदर्शन भरून व व्यसनमुक्ती वर व्याख्यान दिले.  *तसेच पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की, भविष्यात तुम्ही पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती या विषयावरती ज्या ज्या ठिकाणी काम कराल त्या ठिकाणी आमचं सहकार्य मिळेल व शुभेच्छा दिल्या, तसेच श्री अनिल गायकवाड डीवायएसपी यांनी सर्व वृक्ष मित्रांचे व व्यसनमुक्ती वर काम करणाऱ्या तरुणांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या* व्यसनमुक्ती व्याख्याते प्रदीप माळी यांनी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचार,नागरिकांना व्यसनमुक्ती जनजागृती करताना सांगितले की भारत  देश हा तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो.आपल्या भारताची खरी संपत्ती ही युवाशक्ती आहे.परंतु हीच आपली युवा संपत्ती मात्र व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे युवाशक्तीचा प्रवास विनाशाकडे चाललेला आहे तसेच व्यसनामुळे समाजामध्ये चोऱ्या.भांडण.तंटा लूटमार.खुन. बलात्कार अशा घटनां मध्येवाढ दिसत आहेत व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच व्यसन हे समाजाला लागलेली कीड आहे. समाजामध्ये दारू बियर बिडी सिगारेट तंबाखू फटका अशा अनेक व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचा बळी गेलेला दिसून येत आहे.दर सहा सेकंदाला एक.दिवसाला तीनहजार  आणि वर्षाला आकरा लाख लोकांच्या व्यसनामुळे संसाराची राख रांगोळी होताना आपण पाहतो आजचे युवक व्यसन करण्याला फॕसन समजतात परंतु व्यसनामुळे समाजात अनेक वाईट घटना घडतात.म्हणून महीलांनी सुध्दा आपल्या वाढदिवसाला पतीकडे सोने.साडी मागु नका परंतु पतीकडे व्यसनमुक्तीचा संकल्प मागा.तसेच मानवी आयुष्य खूप सुंदर आहे शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती आहे त्यामुळे  देशातील प्रत्येक व्यसनाधीन व्यक्ती ही व्यसनमुक्त झाले पाहिजे. आपण सर्वजण व्यसनमुक्त राहून नवीन पुढे समोर आदर्श ठेवूया आणि आपले गाव आपले राज्य आपला देश व्यसनमुक्त ठेवूया व्यसनमुक्त राहा निर्वेशने रहा आनंदाने जगा असा संदेश प्रदीप माळी यांनी दिला तसेच हातात घोषवाक्य घेऊन प्रचार प्रसार व जनजागृती केले व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले .तसेच मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ स्वाती कांबळे व राज्य परिवहन महामंडळ महिला मोटर मेकॅनिक व मानव उत्कर्ष महिला बचत गटाच्या सचिव सौ त्रिवेणी कांबळे मॅडम यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन केले. ,या कार्यक्रमात श्री अनिल गायकड सहाय्यक पोलिस आयुक्त.श्री अविनाश आघाव पोलिस निरीक्षक .श्री प्रदिप माळी.श्री पोपटराव रसाळ.सौ त्रिवेणी कांबळे.शिवाजी राऊत.बालाजी पांचाळ. राॕबर्टबीट टेक्नाॕलाॕजी कंपनिचे मॕनेजींग डायरेक्टर तेजस आचार्य .सचिन घायवत.योगेश दापके.हरी कारभारी वाकळे.दिनेश दापके.आकाश दापके.मनोज कदम.वेंकट मैलापुरे.सौ पुजा रसाळ.महेंद्र पोपलवार.सुशिला पोपलवार.यशोधरा कावळे.सुनिता पोपलवाड.आशा भगत.राहुल पडघम.श्री बापु कांबळे. वैभव गांगोडे ,सौ लता माळी व्यसनमुक्ती मार्गदर्शक.हे सर्व व्यनमुक्ती व पर्यावरण जनजाजागृती साठी उपस्थित होते करीता हे प्रशस्ती पत्र देण्यात येत आहे. व अशा पद्धतीची जनजागृती भविष्यामध्ये अनेक ठिकाणी करण्यात येणार आहे अशी आव्हान पोपटराव रसाळ व प्रदीप माळी व सौ त्रिवेणी कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ त्रिवेणी कांबळे यांनी केले व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँकेचे सभासद हरी कारभारी वाकळे यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment