जन्मदात्या आईनेच घेतला 8 महिन्यांच्या बाळाचा जीव, महिलेचाही आत्महत्येचा प्रयत्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 16, 2023

जन्मदात्या आईनेच घेतला 8 महिन्यांच्या बाळाचा जीव, महिलेचाही आत्महत्येचा प्रयत्न.

 जन्मदात्या आईनेच घेतला 8 महिन्यांच्या बाळाचा जीव, महिलेचाही आत्महत्येचा प्रयत्न.


कौटुंबिक वादातून पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील एका महिलेने स्वत:च्या आठ महिन्यांच्या मुलास नाक व तोंड दाबून जीवे मारले. या हत्येनंतर आरोपी महिलेनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी आईविरुद्ध चिखली पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेच्या पतीने पत्नीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब चिखलीतील नेवाळे वस्ती या ठिकाणी राहते. 13 जून रोजी पती कामावर गेला असताना घरी आई व लहान बहीण होते. त्यावेळी आरोपी पत्नीने रागाच्या भरात आठ महिन्यांच्या मुलाचे नाक व तोंड दाबून त्याला जिवे मारले. यानंतर घरातील कटरच्या साहाय्याने महिलेने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. घराच्या बाथरूममध्ये महिलेने स्वत:ला कोंडून घेतले होते.

कुटुंबातील लोकांनी बाथरूमचा दरवाजा तोडून महिलेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच, चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. न्यामणे करत आहेत.

No comments:

Post a Comment