सायकलपटू एकनाथ भालेकरचा 230 किमीचा सायकल प्रवास एका दिवसात पुर्ण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

सायकलपटू एकनाथ भालेकरचा 230 किमीचा सायकल प्रवास एका दिवसात पुर्ण.

 सायकलपटू एकनाथ भालेकरचा 230 किमीचा सायकल प्रवास एका दिवसात पुर्ण.


पारनेर -
राळेगणसिद्धी येथील सायकलपटू एकनाथ भालेकर यांनी एका दिवसात सायकलवर 230 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत  पंढरपूर गाठले. पुणे येथील मावळ ॲथलेटीक्स असोसिएशन, वर्ल्ड ऑन व्हील्स व पेडलवाली या संस्थांच्या वतीने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते व त्यात भालेकर यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सायकलवारी एका दिवसातच पूर्ण केल्याने त्यांचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.  
पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेची सुरुवात केली. 
यावेळी भालेकर म्हणाले की, 'सायकल चालवा, प्रदूषण टाळा तसेच पर्यावरण वाचवा' असा संदेश देण्यासाठी सायकल वारीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रदूषणरहीत पर्यावरणासाठी सायकल ही काळाची गरज असून तिचा वापर आपण वाढविला पाहिजे. सर्वांनी आपल्याला शक्य असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर केला पाहिजे. हाच संदेश देत भालेकर यांनी सायकलचे महत्व ठिकठिकाणी सांगितले.  आषाढी एकादशीपूर्वीच पंढरीच्या पांडरंगाचे दर्शन घडल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे भालेकर यांनी सांगितले.  

दिवसभरात १७ तास केले सायकलिंग... सायकल मित्र असलेल्या भालेकर यांनी याआधी दोन दिवसांत 230 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत राळेगणसिद्धी ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण केली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी ही वारी एका दिवसात पूर्ण करण्याचे करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मागील अनुभवाच्या जोरावर त्यांनी शनिवारी (१०) जून रोजी पहाटे ३ वाजता पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान करत सायंकाळी ७ वाजता तब्बल १७ तासांचा प्रवास करत ही सायकल वारी पांडूरंगाच्या दरबारात पोहचली.  - एकनाथ भालेकर, सायकलपटू 

विविध सायकल दौऱ्यांचे अनुभव.. - राळेगणसिद्धी ते पंढरपूर, राळेगणसिद्धी ते पुणे,  पुणे ते राळेगणसिद्धी व अहदनगर ते शिरूर अशा विविध सायकल दौऱ्यांचा अनुभव.

No comments:

Post a Comment