पोलिस नाईकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 22, 2023

पोलिस नाईकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.

 पोलिस नाईकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.


सर्व महिला एकत्र येऊन चारधाम दर्शनासाठी गेले असता त्यांच्यासोबत पत्नीही गेली. दरम्यान, पती किरण साळुंखे, वय ५५ यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत व्यक्ती बार्शी शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होती. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळुंखे यांना १७ वर्षांची मुलगी आणि १६ वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. पत्नी तीर्थयात्रेस जाऊन आठवडा होत आला आहे. किरण साळुंखे हे बार्शीला जाऊन ड्युटी करून येत होते. पत्नी गावाला गेल्यामुळे स्वयंपाकासाठी कोणी नाही, त्यामुळे दोन्ही मुलांना त्यांच्या आत्याकडे ठेवले होते. बुधवारी २१ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास किरण साळुंखे यांनी कविता नगर, सोलापूर येथील राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे. जेलरोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण पोलिस शोधत आहेत.

No comments:

Post a Comment