बुऱ्हाणनगर पाणी योजनेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आक्रमक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 3, 2023

बुऱ्हाणनगर पाणी योजनेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आक्रमक.

बुऱ्हाणनगर पाणी योजनेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आक्रमक.
नगर सोलापूर रोडवर सेनास्टाईल आंदोलन..
अहमदनगर :- नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाकोडी फाटा, दरेवाडी,वाळुज-पारगाव,शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द, वाटेफळ ,रुईछत्तीसी, हातवळण गुंणवडी, यासह ४२ गावांना बुऱ्हाणनगर पेयजल योजना अंतर्गत पाणी पुरवठा होत आहे.पंरतु गेल्या दिड वर्षा पासून नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम चालू आहे.या राष्ट्रीय महामार्ग खोदकामात ही पाईप लाईन वारंवार  तुटली जातं आहे. या फुट तुटी मुळे नगरच्या दक्षिण भागातील  दहा पंधरा गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. वरील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे. महिना महिना पाणी मिळणे दुरापस्त होते.  सदर योजना असल्याने शासन या गावांना  टँकर मंजूर देत नाही.
 या विरोधात आज माजी जिल्हा परिषद  सदस्य संदेश कालेॅ यांनी  दरेवाडी  फाट्यावर सहकार्यसह भर उन्हात आंदोलनचा बडगा उगारल्या मुळे  केंद्रिय विद्यालय जवळ सदर पाईपलाइन फुटली त्या ठिकाणी  खोदकाम बंद पाडले. यावेळी नगर सोलापूर रस्त्याच्या कामा संदर्भात नेमणूक केलेले संपर्क अधिकारी अमोल बोबडे यांनी या सदर पाईपलाइन दुरुस्ती व पाईपलाइन होई पर्यंत खोदकाम बंद चे लेखी आश्वासन  दिले आहे.
या पुढे जर बुर्हानगर पेयजल योजना पाईपलाइन फुटली तर शिवसेना स्टाईलने सदर ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करु असे कालेॅ यांनी ठणकावून सांगितले आहे.
या वेळी ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कालेॅ, दत्तात्रय खांदवे, अमोल उध्दव तोडमल, दरेवाडी ग्रा.सदस्य भाऊ बेरड, अमोल संपतराव तोडमल ,  ज्ञानेश्वर कोरडे, जि.एज व्ही कंपनीचे संपर्क अधिकारी अमोल बोबडे, दत्ता वाघ, दहिगावचे माजी उपसरपंच महेश म्हस्के,आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment