जामिनावर सुटलेल्या आरोपीने चाकूने केला तरुणाचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 4, 2023

जामिनावर सुटलेल्या आरोपीने चाकूने केला तरुणाचा खून.

 जामिनावर सुटलेल्या आरोपीने चाकूने केला तरुणाचा खून.


छत्रपती संभाजीनगर - 
गल्लीतील मित्रांसोबत मद्यप्राशन करत बसलेल्या एका तरुणावर त्याच्याच मित्राने धारदार चाकूने पोटात आणि छातीवर ८ ते १० वार करून खून केल्याची घटना बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान मंदिरामागील माळीवाडा गल्लीत शनिवारी रात्री सव्वा ते दीड यादरम्यान घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव विशाल कैलास शिंदे (२३, रा. माळीवाडा गल्ली, बेगमपुरा) असे असून खून करणाऱ्या आरोपीचे नाव गणेश सूर्यकांत पटारे (३१, रा. तारकस गल्ली, बेगमपुरा) असे आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी सहा महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेला आहे.

पोलिसांनी सांगितले की, विशाल शिंदे हा शनिवारी मित्राच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला. रात्री मित्रांसोबत जगदीश खरात यांच्या घराच्या गेटसमोर मद्यप्राशन करण्यासाठी बसला होता. गेटसमोरील वाळूवर बसलेल्या विशालवर गणेशने अचानक छातीमध्ये चाकूचा वार केला. पुढे काही कळण्याच्या आतच त्याने छातीत आणि पोटात वार करत विशालला जखमी केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे विशालच्या सोबत बसलेल्या त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशालचा मृत्यू झाला, असे वाटल्याने गणेशही निघून जाण्यासाठी निघाला. त्यावेळी जखमी झालेला विशाल उठून घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाला, पण काही पावले पुढे गेल्यावर चक्कर येऊन कोसळला. हे पाहताच निघून जाणारा गणेश पुन्हा परत आला व त्याने खाली पडलेल्या विशालच्या छातीवर चाकूचे वार केले. त्याच्या जखमांवर लाथा मारण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळावरून दारू पिण्यासाठी आणलेला प्लास्टिकचा ग्लास, चिप्सची पाकिटे, पाण्याच्या, शीतपेयाच्या बाटल्या आदी पुरावे हस्तगत केले. घटनास्थळी दोन्ही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. या प्रकरणी विशालच्या लहान भावाच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार विशाल बोडखे करत आहेत.

No comments:

Post a Comment