एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू:पहाटे वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू; सकाळी‎ अपघातात मुलगा ठार‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 4, 2023

एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू:पहाटे वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू; सकाळी‎ अपघातात मुलगा ठार‎.

 एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू:पहाटे वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू; सकाळी‎ अपघातात मुलगा ठार‎.


पहाटे वडिलांचा रुग्णालयात ‎उपचारादरम्यान मृत्यू झल्यानंतर ‎‎सकाळी रस्ता अपघातात मुलगा‎ ठार झाल्याची घटना सिरसो ‎फाट्याजवळ घडली. ‎एकाच दिवसात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा‎ पसरली आहे. दुचाकीवर प्रवास ‎करीत असलेल्या मुलाचा टिपरने ‎धडक दिल्याने मृत्यू झाला.‎

मूर्तिजापूर तालुक्यातील‎ रेपाडखेड येथील रहिवासी सिद्धार्थ‎ जामनिक (वय ४० वर्ष) यांचे‎ वडिल जानरावजी जामनिक यांना‎ उपचारार्थ मूर्तिजापूर येथे खासगी‎ रुग्णालयात दाखल करण्यात‎ आले होते. मात्र त्यांचा पहाटे ४‎ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.‎ पुढील सोपस्कार करण्याकरीता‎ सिद्धार्थ जामनिक हे‎ दुचाकीने रेपाडखेडकडे निघाले.‎ सुमारे ६ वाजताच्या दरम्यान‎ सिरसो फाट्याजवळ त्यांच्या‎ दुचाकीला समोरून येत‎ असलेल्या टिपर‎ जोरदार धडक दिली.

हा अपघात‎ एवढा भीषण होता की दुचाकीचे‎ समोरील चाक पूर्णपणे तुटले होते.‎ सिद्धार्थ जामनिक यांच्या पाय‎ आणि डोक्याला जबर दुखापत‎ झाली. त्यांना मूर्तिजापूर येथील‎ उपजिल्हा रुग्णालयात दाखल‎ करण्यात आले होते. त्यांची गंभीर‎ अवस्था पाहता त्यांना तत्काळ‎ अकोला येथे हलवण्यात आले.‎ मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन‎ लहान मुलं असून, ते कुटुंबाचे‎ आधार होते.‎ दरम्यान या अपघात प्रकरणी‎ मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस‎ स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात‎ आला असून, पोलिस तपास‎ करीत आहेत.‎

No comments:

Post a Comment