विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 24, 2023

विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार.

 विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार.


पाचोड :
 शेतात सरपण आणण्यासाठी गेलेल्या बावीसवर्षीय विवाहित महिलेस एकटी पाहून तिघा सख्ख्या भावांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) पारुंडी (ता.पैठण) येथे घडली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता.२२) रात्री ''त्या'' नराधम भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा.पारुंडी ता.पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पारुंडी (ता.पैठण) येथील बावीसवर्षीय विवाहिता मंगळवारी (ता.२०) दुपारी शेत बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे सरपण आणण्यासाठी गेली होती. यावेळी जवळच उभे असलेल्या तिघा सख्ख्या भावांनी तिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर पीडिता घरी गेली. तिने घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र, गुरुवारी (ता.२२) सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडितेने पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे नराधम आरोपी फरार झाले असून पाचोड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment